Top News

भडगांव तालुक्यातील वाडे येथील शेतातून 14 क्विंटल कापूस चोरी; भडगांव पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल.!!!

 भडगांव तालुक्यातील वाडे येथील शेतातून 14 क्विंटल कापूस चोरी; भडगांव पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल.!!!


भडगांव प्रतिनिधी :-

तालुक्यातील वाडे येथील शेतातील गोण्यांमधे भरलेला 14 क्विंटल कापूस अज्ञात चोट्याने चोरून नेल्याची घटना दि. २७ रोजीच्या मध्यरात्री घडली आहे. याबाबत भडगाव पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


तालुक्यातील वाडे येथील शेतकरी समाधान महाजन यांच्या शिवारातील (गट नंबर ११२/१) येथिल शेतातील शेडमधून अज्ञात चोरट्यांनी ७० हजार रूपये किमतीचा अंदाजे १४ क्विंटल कापूस गोण्यांमध्ये भरलेला प्रत्येकी ५००० रुपये क्विंटल दराप्रमाणे अज्ञात चोरट्याने चोरून नेला.

याप्रकरणी समधान दयाराम महाजन रा.वाडे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध भाग 5 गुरन २९९ / २०२२ भादवी कलम ३८०,४६१, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शना खाली पोहेकाँ पांडुरंग सोनवणे हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने