Top News

धक्कादायक! गॅस रिफिलिंग नंतर आता हायवे वर 'राखेची' अवैध रिफिलिंग; अपघातांना निमंत्रण देणारे 'बल्कर' पुन्हा चर्चेत

धक्कादायक! गॅस रिफिलिंग नंतर आता हायवे वर 'राखेची' अवैध रिफिलिंग; अपघातांना निमंत्रण देणारे 'बल्कर' पुन्हा चर्चेत


भुसावळ: अरुण तायडे 

घरगुती गॅस सिलिंडरची अवैध रिफिलिंग तुम्ही आजवर ऐकली असेल, पण आता चक्क 'राखेची' (Fly Ash) अवैध रिफिलिंग हायवे वरील ढाब्यांवर राजरोसपणे सुरू असल्याचे सुजान नागरिकांचे म्हणणे आहे. नागपूर-सुरत महामार्गावरील ढाब्यांवर ३५ टन क्षमतेच्या बल्करमध्ये चक्क ६२ टनां पर्यंत राख कोंबली जात असून, या 'ओव्हरलोड' खेळामुळे नागरिक अवाक झाले आहेत.

नेमका प्रकार काय?

​दीपनगर औष्णिक केंद्रातून निघणारी फ्लाय ॲश वाहून नेण्यासाठी ३५ टन क्षमतेचे अवजड बल्कर वापरले जातात. मात्र, वाहतूक खर्च वाचवण्यासाठी आणि अधिक नफा कमावण्या करिताहायवेवरील ढाब्यांवर हे बल्कर उभे केले जातात. तिथे असलेल्या एअर कॉम्प्रेसरच्या सहाय्याने हवेचा दाब (Pressure) निर्माण करून एका बल्करमधील राख दुसऱ्या बल्करमध्ये ट्रान्सफर केली जाते. या अवैध रिफिलिंगसाठी ढाबा मालकांना ठराविक रक्कम दिली जाते आणि ३५ टनांच्या जागी तब्बल ६० ते ६२ टन राख भरली जाते.

​सर्व्हिस रोडवर अनधिकृत पार्किंग आणि अपघातांचे सत्र

​हे महाकाय बल्कर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर हे बल्कर खुशाल उभे केलेले असतात, ज्यामुळे इतर वाहनधारकांना रस्ता शोधणे कठीण होते. अनेकदा हे बल्कर अशाच धोकादायक पद्धतीने उभे असल्याने किंवा ओव्हरलोडिंगमुळे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाल्याचेही पाहायला मिळाले आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या या 'चालत्या-फिरत्या बॉम्ब'मुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

​नागरिकांची प्रतिक्रिया: "आम्ही आजवर गॅस रिफिलिंगचे धोके ऐकले होते, पण राखेची अशी प्रेशरने होणारी रिफिलिंग पाहून आम्ही थक्क झालो आहोत. हायवेवर हे बल्कर कुठेही उभे असतात, आरटीओ आणि पोलीस प्रशासन याकडे डोळेझाक का करतेय?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.

*रस्तेही होतायत खराब

​क्षमतेपेक्षा दुप्पट राख भरल्यामुळे या जड वाहनांचा भार रस्त्यांना सोसवत नाहीये. परिणामी, कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेले महामार्ग आणि सर्व्हिस रोड उखडले जात आहेत. धुळीच्या प्रदूषणामुळे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

​या गंभीर प्रकाराबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांचे कडून अशा दोषी आढळणाऱ्या बल्कर मालकांवर आणि चालकांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई कधी करण्यात येईल ? असा प्रश्न सुजान नागरिकांना पडलेला दिसून येत आहे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने