येवतीत शुक्रवारी साजरी होणार करदोडा दिवाळी.!!!
जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्करबोदवड तालुक्यातील येवती येथील अंबऋषी महाराजांची करदोळा दिवाळी २८ ऑक्टोबरला शुक्रवारी साजरी होणार आहे गेल्या ११०वर्षापासून ही परंपरा सुरू आहे येवती येथे नामदेव बळीराम माळी यांचे गावाजवळ शेत आहे या शेतात अंबऋषी महाराजांचे मंदिर आहे या मंदिरामध्ये करदोडा दिवाळी साजरी केली जाते गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहतात मंदिरातील अंबूऋषी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून महिलांकडून महाराजांच्या मूर्तीला करदोडा बांधण्यात येतो नंतर सामूहिक आरतीचे गायन होते नैवेद्य अर्पण केल्यावर मंदिर परिसर व गावात फटाक्याची आतीषबाजी होते दरम्यान करदोळा दिवाळीच्या सणामागे मोठी आख्यायिका आहे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी गावातील लोकांना त्वचारोगाने ग्रासले होते यावेळी गावा जवळील शेतात अंबऋषी महाराजांचे झोपडीत वास्तव्य होते त्यांनी असाध्य रोगाचे निराकरण केल्याने ग्रामस्थांनी श्रद्धेपोटी त्यांची सेवा सुरू केली काही वर्षानंतर अंबऋषी महाराजांचे दिवाळीच्या दिवशी देहावसान झाले त्यामुळे येवती व रेवती ग्रामस्थ दिवाळी सण साजरा करत नाही त्याऐवजी भाऊबीज नंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी अथवा शुक्रवारी करदोळा दिवाळी साजरी करतात

टिप्पणी पोस्ट करा