Top News

तालुक्यातील 33 वर्षीय महिलेची छेड काढल्या प्रकरणी एका विरोधात भडगांव पोलिसात गुन्हा दाखल.!!!

 तालुक्यातील 33 वर्षीय महिलेची छेड काढल्या प्रकरणी एका विरोधात भडगांव पोलिसात गुन्हा दाखल.!!!

भडगांव प्रतिनिधी :-

 तालुक्यातील एका गावात तरुणाने 33 वर्षीय महिलेचा त्याच्याकडील मोबाईलवरील वॉट्सअप स्टेट्स  ठेवत मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. म्हणून भडगाव  पोलिस स्टेशनला तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भडगाव तालुक्यातील एका गावातील 33 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी तरुणाने माझे फोटो त्याच्या मोबाईल स्टेट्स वर ठेवला. म्हणून मी त्याला विचारायला गेली असता तरुणाने शिवीगाळ करून महिलेचा हात धरून तू मला आवडते तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसतो असे बोलून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच सदर महिला ही शेतात जात असताना तिचा पाठलाग करून महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी आरोपी भुषण मनोहर पाटील या तरुणाविरूद्ध भडगाव पोलिस स्टेशनला भाग 5 गु. र. न.298/2022 भा. द. वी. कलम 354,354(ड) 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. हे.काँ. कैलास गीते हे करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने