Top News

पेण फोटोग्राफरने आदिवासी वाडीवर साजरी केली दिवाळी.!!!

 पेण फोटोग्राफरने आदिवासी वाडीवर साजरी केली दिवाळी.!!!


    पेण (विनायक पाटील) - रायगड फोटोग्राफर असोसिएशन संलग्न असलेल्या पेण फोटोग्राफर असोसिएशने नुकतेच दरवर्षी प्रमाणे दिपावली निमित्त पेण येथील दुर्गम भागातील वेताची आदिवासी वाडीवर जावुन येथील आपल्या आदिवासी बांधवाना फराळ व छोट्या फटाक्यांचे वाटप करून त्यांच्या सोबत दिवाळी साजरी केली.

    पेण फोटोग्राफर असोसिएशन नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत आसते. यावेळी हा उपक्रम राबविताना प्रत्येकाच्या चेहर्‍यावर वेगळाच आंनद जावनत होता. या वाडीवरील लहान मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात सदस्य एवढे मग्न झाले होते की त्याच्या सोबत वेळ कसा निघून गेला हे समजले नाही. यावेळी या वाडीत प्रत्येक घर टिप फराळ व छोट्या फटाक्यांचे वाटप तसेच लहान मुलांना वही,पेन व गोड खाऊचे वाटप करण्यात आले. 

     यावेळी पेण फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष समाधान पाटील, सचिव पत्रकार प्रकाश माळी, दर्यासागर,आनंद निंबरे, मनोज म्हात्रे, नावेद खान, दत्ता पाटील, साहील पाटील, सोनु क्षिरसागर, नरेश राऊत तसेच पेण फोटोग्राफर असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने