Top News

भारतीय जनता पक्ष वाशी-वडखळ विभाग आयोजित दिपसंध्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.!!!

 भारतीय जनता पक्ष वाशी-वडखळ विभाग आयोजित दिपसंध्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.!!!


कलाकारांनी गायलेल्या गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली°°°


पेण(विनायक पाटील) :- "14 विद्या 64 कला यांचे अधिपती असणाऱ्या गणेश पूजन व वंदनाने दिपसंध्या सुरेल मैफिल कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. "गाई ये गज वंदन", "सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी", "रुणझुण रुणझुण रे भ्रमरा", "अबीर गुलाल उधळीत नाथा घरी" या विविध गाण्यांने

 दिपसंध्या गाण्याची सुरेल मैफिल कार्यक्रमात उपस्थितांची मने जिंकली.


     भारतीय जनता पक्ष वाशी-वडखळ विभाग आयोजित दिपसंध्या गाण्याची सुरेल मैफिल कार्यक्रम वाशी येथील जगदंबा मातेच्या मंदिराच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी आमदार रविशेठ पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, युवानेते वैकुंठ पाटील, भाजप रायगड सरचिटणीस मिलिंद पाटील, पेण तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, विलास मनोरे, वी.बी.पाटील, वंदना पाटील, सरपंच गोरख पाटील, वढाव सरपंच पूजा पाटील, उद्योजक अशोक पाटील, नंदकुमार पाटील, मोरेश्वर पाटील, पद्माकर पाटील,निलेश पाटील, महेश भिकावले, वाशी वडखळ विभाग अध्यक्ष जितू म्हात्रे, कृष्णा वर्तक, राजेन्द्र पाटील, देविदास म्हात्रे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

    या कार्यक्रमात दत्तात्रेय मोकल, जयश्री पुजाती यांनी आपल्या सुरेल आवाजात कार्यक्रमात रंगत आणली. त्यांना संतोष म्हात्रे, अभिषेक मोकल, पंकज मोकल यांनी साथ दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश थवई यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने